चंदगड / सी एल वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री रवळनाथाचे दर्शन घेऊन आणि माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांचा आशिर्वाद घेऊन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार शिवाजी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी, सर्व उमेदवार व चंदगड शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजप शिवसेना युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काणेकर, सौ. जयश्री रामा जुवेकर, तेजस गावडे, अबुजर अब्दुलरहीम मदार, सौ. आयेशा समीर नायकवाडी, शकील काशीम नाईक, तजमुल सलीम फनीबंद, सौ. वैष्णवी सुनील सुतार, सौ. शितल अनिल कट्टी, सौ. माधवी उमेश शेलार, सचिन निंगाप्पा नेसरीकर,
सौ. आसमा असिफ बेपारी, सौ. सुचिता संतोष कुंभार, सौ. गायत्री गुरुनाथ बल्लाळ, संदीप गोपाळ कोकरेकर, सौ. एकता श्रीधन दड्डीकर, सचिन सुभाष सातवणेकर यांच्यासह सचिन बल्लाळ, सुरेश सातवणेकर, लक्ष्मण गावडे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, सर्व उमेदवार व चंदगड शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments:
Post a Comment