चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील रवळनाथ मंदिरात रविवारी (8 मार्च) रोजी महिलादिनी शिव शक्तीस्थळ आणि वेंगरूळ (ता. भुदरगड) येथील सव्यसाची गुरुकुलम यांच्यातर्फे भारतीय व्यायाम आणि स्व संरक्षण शिवशक्तीस्थळाजवळ गुरुकुलमचे विद्यार्थी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत . गुरुकुलमच्या माध्यमातून गावागावात भारतीय व्यायाम आणि शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण देण्याबाबत जनजागृती केली जात आहे .समाज . निर्मितीसाठी शक्ती , युक्ती , चातुर्य आणि विवेकाची गरज असते . कोणतीही कला व विद्या अध्यात्माशिवाय अपूर्ण आहे . वेदापासून उपनिषेदापर्यंतच्या ग्रंथसंपदेत सामाजिक भानाची शिकवण आहे . भगवद्गीता हा मानवी जीवनाचा सार आहे . शस्त्रं आपल्याला संयम शिकवतात . युध्द टाळतो आणि तरीही जो विजयी होतो , तोच सर्वश्रेष्ठ सेनापती असतो . शस्त्र आणि शास्त्राची सांगड घालून वाटचाल केली तरच देशाची प्रगती होते असे विचार वेंगरूळ ( ता . भूदरगड ) येथील सव्यासाची गुरुकुलाचे प्रमुख लखनजी जाधव यांनी व्यक्त केले . रविवारी सकाळी ८ ते ११ यावेळेत रवळनाथ मंदिराजवळ प्रात्यक्षिक होणार आहे . त्यानंतर दुपारी १२ . ३० ते २ . ३० या वेळेत महिलांसाठी विशेष परिसंवादाचे आयोजन असून प्रिती जाधव या महिलांना मार्गदर्शनकरणार आहेत . सायंकाळी ४ ते ६ या वेळेत प्रात्यक्षिकांसह अन्य प्रश्नांवर लखनजी जाधव लोकांशी सुसंवाद साधणार आहेत . चंदगडमध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला पुतळा उभा करायचा नाही तर त्यांचे विचार लोकांमध्ये रूजवायचे आहेत . म्हणूनच मल्लखांब व्यायामशाळा , ऐतिहासिक पुस्तकांचा खजाना असलेले ग्रंथालयही चालवायचे आहे असे उद्योजक सुनील काणेकर यांनी यावेळी सांगितले. आर्कीटेक्ट धनंजय वैद्य यांनी यासाठी पुढाकार घेतला असून उद्योजक सुनील काणेकर , अनिकेत घाटगे , प्रा . जोतिबा पाटील , भास्कर कामत , नामदेव मांगले , शांताराम भिंगुडे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे .
No comments:
Post a Comment