बेळगाव येथील पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सीमाकवी रविंद्र पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2020

बेळगाव येथील पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सीमाकवी रविंद्र पाटील

रविंद्र पाटील
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंडळ बेळगाव आयोजित ८ मार्च २०२० रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे १ले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे.या पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सीमाकवी रवींद्र पाटील यांची निवड बेळगाव जिल्हाध्यक्ष अॅड सुधीर चव्हाण यांनी केली .
या परिषदचे कर्नाटक राज्याचे ते राज्याध्यक्ष असून सीमाकवी, पत्रकार , निवेदक व तज्ञशिक्षक म्हणून  त्याची ओळख आहे. बेळगाव ग्रामीण भागात १० ते १२ साहित्य संमेलने होत असून शहरी भागात हे पहिले राज्यस्तरीय संमेलनाची भरवण्याची  संकल्पना आणि मराठी , भाषा, संस्कृती व परंपरा याचे संवर्धन व्हावे . सन २०१८ अ.भा.सा. संमेलन बडोदा गुजरात येथे बेळगाव सीमाप्रश्नावर 'लढा ' ही कवीता सादर केली होती . 
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे सिमाभगात समाधान व्यक्त केले जात आहे.


No comments:

Post a Comment