अडकूर येथे रवळनाथ मंदिर ते शिवाजी चौक रस्त्यावरील अतिक्रमण काढताना.
|
अडकूर / प्रतिनिधी
अडकूर ( ता. चंदगड ) येथील रवळनाथ मंदिर ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने झालेली अतिक्रमणे बांधकाम विभागाने जेसीबी यंत्राच्या साह्याने काढून टाकली .
येथील मुख्य बाजारपेठ मधून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूना काही ग्रामस्थांकडून अतिक्रमण करण्यात आली होती . संबधीत ग्रामस्थांना बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीसा दिल्या होत्या .यानंतर काल बांधकाम उपविभागाचे उपअभियंता एस .ए. सासणे , शाखा अभियंता एम .ए. जमादार , सरपंच श्रीमती यशोधा कांबळे , उपसरपंच अनिल कांबळे , सुनिल देसाई , बंडू चंदगडकर , राजाराम घोरपडे , स्वाती माटले , उषा आर्दाळकर , दिपाली परीट , सुमन शिवनगेकर , राजलक्ष्मी पाटील ग्रामसेवक एस .ए. सोनार यांच्या उपस्थितित सर्व अतिक्रमणे काढण्यात आली . यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीने धडक कारवाई करत अतिक्रमणे काढल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे .
No comments:
Post a Comment