मनसेच्या वतीने चंदगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2020

मनसेच्या वतीने चंदगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी

मनसेच्या चंदगड पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देताना जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, उपजिल्हा अध्यक्ष पिनु पाटील व इतर.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार  संपर्क प्रमुख यशवंत क़िलेदार  यांच्या सुचनेनुसार जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले व उपजिल्हा अध्यक्ष प्रताप उर्फ पिनु पाटील यांच्या उपस्थितीत   महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगड तालुका नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्तीचे पत्र वाटपाचा कार्यक्रम चंदगड तालुक्यातील  हलकर्णी  येथील गणेश मंदिर मध्ये पार  पड़ला. 
या वेळी पक्षाची धेय धोरणे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य गावोगावी पोहचवुन गाव तेथे शाखा वाढवून जनतेच प्रश्न व न्यायदानाचे काम नूतन पदाधिकारी यांच्या हातून व्हावे अशी अशा  वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नवनिर्माण सेना चंदगड तालुका अध्यक्ष राज बंडू सुभेदार, उपतालुका अध्यक्ष  जिल्हा परिषद निहाय अविनाश मारुती पाटील, ज्ञानेश्वर ईश्वर धूरी, संतोष सदानंद बसरिकट्टी, विभाग अध्यक्ष जिल्हा परिषद निहाय,अमृत रामचंद्र गावड़े- तुड़ये, संतोष  बारवेलकर - चंदगड, कैलास बोकडे  तुर्केवाडी उपविभाग अध्यक्ष मोहन पाटील,अर्जुन टक्केकर, शहर अध्यक्ष गजानन तुपारे, रघुनाथ सावंत, वाहतुक सेना तालुका अध्यक्ष गणेश बागड़ी, प्रसिद्धि प्रमुख तालुका अध्यक्ष योगेश बल्लाळ, सहकार सेना तालुका अध्यक्ष परशराम मळविकर विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष नामदेव गोंधळी विद्यार्थी सेना उपतालुका अध्यक्ष सचिन काबंळे, कामगार सेना तालुका अध्यक्ष विवेक मनगुतकर, कामगार सेना उपतालुका अध्यक्ष सचिन गुरव याची निवड करण्यात आली.


No comments:

Post a Comment