![]() |
हलकर्णी महाविद्यालयात ' फिट इडिया ' विषयावरील कार्यशाळेत बोलताना पी. जे. मोहनगेकर, व्यासपीठावर इतर मान्यवर. |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
शारीरीक तदुंरुस्ती ही आजच्या धकधकीच्या जिवणात महत्त्वाची आहे. नियमित व्यायाम सकस आहार, आवश्यक झोप या सगळ्यातुन व्यक्तिमत्त्व सपंन्न होत असते. देहाची योग्य काळजी घेतली तरच आपण तंदुरुस्त राहु " असे प्रतिपादन पी.जे. मोहणगेकर यांनी केले. दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे सपंन्न झालेल्या शिवराज अग्रणी अंतर्गत ' फिट इडिया ' विषयावरील कार्यशाळेत बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.वाय. निबांळकर होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणि घालुन कार्यक्रमाचे उद्घघाटण करण्यात आले. प्रास्ताविक समन्वयक प्रा.जी.जे. गावडे यांनी केले. मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊण स्वागत करण्यात आले. यावेळी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कोवाड, कार्वे येथील महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक कार्यशाळेत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना प्रा.पी.ए. घोगंडे म्हणाले, " शारीरीक क्षमतेसाठी योगासन, प्राणायम, नियमित फिरणे, फलआहार, सकसभोजन या सगळ्यातुन शारीरीक व बौद्धिक सक्षमता प्राप्त होते. शरीरातील उर्जाशक्ती सतत कार्यशिल राहते. " या वेळी श्री. घोगंडे यांनी योगाचे प्रात्याक्षिक देखिल करुण दाखवले.
''अग्रणी कार्यशाळेच्या निमित्ताने महाविद्यालयात अशा कार्यशाळा घेता आल्या. फिट इडिंया ही सकंल्पना तंदुरुस्ती व शारीरीक दृष्टया महत्त्वाची कार्यशाळा ठरावी, " असे अध्यक्षिय भाषणात प्राचार्य निबांळकर यांनी सागितले. यावेळी नॅक समन्वयक डॉआर.आय. जरळी, डॉ. चद्रकांत पोतदार, डॉ.जे.जे. व्हटकर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र सचालण कु. दिपाली पाटील हिने तर आभार प्रा. ज्ञानेश्वर पाटील यांनी मांडले.
No comments:
Post a Comment