![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात महाविद्यालयात उत्कृष्ट भित्तीपत्रके तयार करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देताना किसनराव कुऱ्हाडे. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोवाड येथे समाजशास्त्र विभागामार्फत विविध सामाजिक समस्येवर प्रकाश टाकणाऱ्या पोस्टर्स चे प्रदर्शन भरवण्यात आले. डॉ. ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवराज शिक्षण संकुल अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रस्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा व्ही. के. दळवी यांनी केले. स्वागत के. एस. काळे यांनी केले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे किसनराव कुराडे म्हणाले समाजात होणाऱ्या वाईट प्रथांवर विशेषतः महिला व मुलींवरील अन्याय, अत्याचार, झुंडशाही, महामानवांचे पुतळे फोडणे, स्त्रीभ्रूणहत्या, मुलींना मुलांपेक्षा कमी लेखण्याची मानसिकता इत्यादी बाबींवर प्रकाश टाकून समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी विशेषत: विद्यार्थिनींनी उत्कृष्ट भित्तीपत्रके तयार केली. यातून बोध घेऊन जाणीवजागृती होईल व अशा वाईट प्रथा थांबविण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी प्राचार्य एस. एम. पाटील, संचालक याकूब मुल्ला, बी आर पाटील, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा मोहन घोळसे यांनी केले. आभार शितल पाटील हिने मानले.
No comments:
Post a Comment