नांदवडे येथील मळविकर दांपत्याचा पुढाकार
चंदगड / प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तान्हाजी हा थ्रीडी सिनेमा इतिहासाची प्रत्यक्ष अनुभती विद्यार्थ्यांनी घेतली. सरपंच सौ. संज्योती मळविकर व अॅड. संतोष मळवीकर या दाम्पत्यांने स्वखर्चातून मुलांना हा ऐतिहासिक सिनेमा पडद्यावर प्रत्यक्ष अनुभवायला दिला.
नांदवडे येथील पहिली ते सातवीच्या 110 विद्यार्थ्यांनी बेळगाव येथील ग्लोब चित्रपटगृहात तान्हाजी चित्रपट पाहिला. महाराष्ट्राच्या मातीतील ज्वाज्वल्य इतिहासाचे एक पान असलेले नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे प्रत्यक्ष ओळख नांदवडे गावच्या विद्यार्थ्यांना व्हावी. यातून इतिहासाच्या गोडी सोबत देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांच्या मनात जागृत व्हावे. या उद्देशाने नांदवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष मळविकर व गावच्या सरपंच सौ. संज्योती मळविकर या दांम्पत्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तानाजी या चित्रपटाची तिकिटे उपलब्ध करून दिली. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशराम पवार, माजी अध्यक्ष नामदेव गावडे यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल्याचे सांगून त्याचे आभार मानले.
![]() |
नांदवडे (ता. चंदगड) येथील केंद्राशाळेतील विद्यार्थ्यांनी मळविकर दांपत्याचा पुढाकाराने बेळगाव येथे तान्हाजी चित्रपट पाहिला. |
नांदवडे (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तान्हाजी हा थ्रीडी सिनेमा इतिहासाची प्रत्यक्ष अनुभती विद्यार्थ्यांनी घेतली. सरपंच सौ. संज्योती मळविकर व अॅड. संतोष मळवीकर या दाम्पत्यांने स्वखर्चातून मुलांना हा ऐतिहासिक सिनेमा पडद्यावर प्रत्यक्ष अनुभवायला दिला.
नांदवडे येथील पहिली ते सातवीच्या 110 विद्यार्थ्यांनी बेळगाव येथील ग्लोब चित्रपटगृहात तान्हाजी चित्रपट पाहिला. महाराष्ट्राच्या मातीतील ज्वाज्वल्य इतिहासाचे एक पान असलेले नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे प्रत्यक्ष ओळख नांदवडे गावच्या विद्यार्थ्यांना व्हावी. यातून इतिहासाच्या गोडी सोबत देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांच्या मनात जागृत व्हावे. या उद्देशाने नांदवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष मळविकर व गावच्या सरपंच सौ. संज्योती मळविकर या दांम्पत्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तानाजी या चित्रपटाची तिकिटे उपलब्ध करून दिली. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशराम पवार, माजी अध्यक्ष नामदेव गावडे यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल्याचे सांगून त्याचे आभार मानले.
No comments:
Post a Comment