ओलम शुगरकडून 2920 रु. प्रति टन दराने ऊस बिले जमा, गडहिंग्लज विभागात अव्वल दर - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2020

ओलम शुगरकडून 2920 रु. प्रति टन दराने ऊस बिले जमा, गडहिंग्लज विभागात अव्वल दर

ओलम शुगरकडून लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन मार्गदर्शन उपक्रम
भरत कुंडल
कागणी : प्रतिनिधि
कोरोनामुळे साखर कारखानदारी गंभीर संकटात असतानाही महाराष्ट्रात प्रथमच राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस (ओलम) शुगर्सने यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या संपूर्ण उसाची संपूर्ण बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती यूनिट हेड भरत कुंडल व शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.
 ते म्हणाले, एफआरपी नुसार दर 2845 रु. इतका होतो, मात्र आम्ही 1 मार्च ते 17 मार्च पर्यंत गाळप ऊसाला अनुदानासह 2920 रु. प्रति टन दर दिला आहे, हा दर एफआरपीपेक्षा 75 रुपये जादा आहे. तर मार्च महिन्यात गाळप उसाची संपूर्ण बिले जमा करणारा हा महाराष्ट्रातील पहिला कारखाना आहे. 
सुधीर पाटील म्हणाले, ``सीमाभाग व गडहिंग्लज विभागात 2920 रु दर देणारा हा साखर कारखाना अव्वल ठरला  आहे. त्यामुळे 11 फेब्रुवारी पूर्वी गाळप उसाला 2845 रु. प्रती टन तर पूरग्रस्त भाग म्हणून 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत गाळप उसाला प्रति टन 2900 रु. दर देऊन आम्ही सामाजिक बांधिलकी जपली. 2019-20 या हंगामात 17 मार्च अखेर 6 लाख 50 ह जार टन ऊस गाळप झाला असून सरासरी उतारा 12.85 टक्के इतका आहे.``
सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने ऊस विभागाच्यावतीने चंदगड, आजरा व गडहिंग्लज भागातील ओलम गट कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना मोबाईलद्वारे संवाद साधून ऊस पिकाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. रोज साधारणतः ६० शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जात आहे.  परंतू सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु असल्यामुळे शेतावर गटाने जाण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. या परिस्थितीत शेतकर्‍याना  शेतकरीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संवादातून त्यांच्या समस्येचे निराकारण होत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आम्ही शेतकऱ्यांना ऑनलइन मार्गदर्शनही करत आहोत. महाराष्ट्रात प्रथमच आम्ही  मार्च अखेरीस बिले जमा केली. सीमाभागासह गडहिंग्लज  विभागात अव्वल दर देऊन आदर्श निर्माण करू असे मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. 


No comments:

Post a Comment