चंदगड शहरामध्ये १ ते ३ मेपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे नगरपंचायतीचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2020

चंदगड शहरामध्ये १ ते ३ मेपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे नगरपंचायतीचे आवाहन

चंदगड / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड शहरातील सर्व नागरीकांनी १ ते ३ मे २०२० या कालावधीत जनता कर्फ्युचे काटेकोर पालन करावे. यामधून केवळ मेडिकल, बँक, रेशन दुकान, दुध संस्था अशा अत्यावश्यक आस्थापना चालू रहातील असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. 
चंदगड शहरासाठी ३० एप्रिल ते ३ मे २०२० या कालावधीत जनता कर्फ्युचे आयोजन केले होते. मात्र चंदगड शहरातील व्यावसायिकांच्या विनंतीप्रमाणे नागरीकांची गैरसोय होवू नये. यासाठी नगरपंचायतीच्या वतीने १ ते ३ मे २०२० या कालावधीत जनता कर्फ्युचे आयोजन केले आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य किराणा, भाजीपाला व तत्सम आस्थापन बंद असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी सहकार्य करावे. सद्याच्या परिस्थितीप्रमाणे ४ मे २०२० पासून दुकाने सकाळी ९ ते २ पर्यंत सुरु राहतील. चंदगड शहरातील जनतेने घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित जगताप यांनी केले आहे. 

1 comment:

Post a Comment