हलकर्णी येथे 9 ते 12 एप्रिलला अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के कडकडीत बंदचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2020

हलकर्णी येथे 9 ते 12 एप्रिलला अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के कडकडीत बंदचा निर्णय


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
कोरोना दक्षता समिती आणि ग्रामपंचायत हलकर्णी (ता. चंदगड ) यांच्या वतीने दि. 9 एप्रिल ते 12 एप्रिल 2020 या दिवशी शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्याचे ग्रामपंचायत, पोलिस पाटील, दक्षता कमिटी यांच्या बैठकीमध्ये 
सर्वानुमते ठरवण्यात आले आहे.
     यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा म्हणुन मेडीकल स्टोअर्स आणि डॉक्टर वगळून कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. यावेळी गावाबरोबर हलकर्णी फाट्यावर देखिल कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. गावातील व फाट्यावरील सर्व दुकाने,दुध डेअरी,भाजीमार्केट रेशनदुकान ,पंतसंस्था,गिरणी, पेट्रोलपंप,सर्व प्रकारची वाहने दुचाकी, चारचाकी ट्रॅक्टर बंद रहातील. तसेच शेती मशागतीची कामे 4 दिवस पूर्ण वेळ  बंद राहणार आहेत. तरी परीसरातील गावातील नागरिकांना या बंद काळात हलकर्णी हद्दीत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच या 4 दिवसात गावात कुणीही विनाकारण फिरल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या दिवशी कोणीही बंदचे उल्लंघन केल्यास कडक आणि कायदेशिर कारवाई करण्यात येईल असेही सभेत ठरवण्यात आले आहे. याची सर्वांनी नोंद घेऊन आता पर्यंत जसे प्रामाणिक सहकार्य केलात त्याच प्रमाणे 9 एप्रिल ते 12 एप्रील 2020 या कालावधीत लॉकडाउन पाळून सहकार्य करावे. असे आवाहन ग्रामपचांयत, पोलिस पाटील, दक्षता कमिटी मार्फत करण्यात आले.

No comments:

Post a Comment