कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सील केलेल्या अकरा गावांचा कोल्हापूर एसपीनी घेतला आढावा - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2020

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सील केलेल्या अकरा गावांचा कोल्हापूर एसपीनी घेतला आढावा

तुडये : सील केलेल्या गावांचा आढावा घेताना चर्चा करताना डॉ. अभिनव देशमुख व पो. नि. अशोक सातपुते.
तुडये / प्रतिनिधी
बेळगुंदी (ता. बेळगाव) येथे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर खबरदारी म्हणून जवळ असणाऱ्या चंदगड तालुक्यातील अकरा गावे सील आहेत. या गावांचा आढावा कोल्हापूरचे एस पी डॉ अभिनव देशमुख यांनी रविवारी तुडये येथे भेट देऊन घेतला.
शिनोळी खुर्द, शिनोळी बुद्रुक, मळवी, मळवीवाडी, सुरुते, तुडये,  कोलिक, म्हाळुंगे या गावातील बंदोबस्ताची माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी घेतली. अकरा गावांच्या सीमा बंद केल्या असून या गावातील या गावातील लोक बाहेर तसेच बाहेरील लोक या गावांमध्ये प्रवेश दिला जात नसून सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याबाबत चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांना योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.  सरपंच शिवाजी कांबळे, आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आय. नायकवडी, पोलिस पाटील जयवंत पाटील, ग्रामविकास अधिकारी जनार्दन पांदे यांच्यासह अन्य पदाधिकारी कोरोना बाबत आवश्यक ती खबरदारी घेत आहेत. डॉ. अभिनव देशमुख यांनी चंदगड पोलिसांना संचार बंदी बाबत मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment