कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवे लावण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला तालुक्यातून प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवे लावण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला तालुक्यातून प्रतिसाद

दिवे लावण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने घरासमोरील परिसर उजळून निघाला होता. 
चंदगड / प्रतिनिधी
कोरोनाच्या पा१र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याबाबत केलेल्या आवाहनाला शहरासह चंदगड तालुक्यातील विविध गावांत उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरासह अडकूर, हलकर्णी, नांदवडे, माणगाव, शिनोळी, कोवाड, तुर्केवाडी या परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. रात्री ९ वाजता लोकानी घरातील लाईट बंद करून घरासमोर व गच्चीतून दिवे लावले. सोशल डिस्टन्सींग पाळत लोकानी दिवे लावून एकजूट दाखविली. मेणबत्ती, दिप, टॉर्च उशा स्वरूपात नागरिकानी दिवे लावून गो कोरोनाचा घोषणा दिल्या. लहान मुलांच्यासह वयोवृद्धांनीही यामध्ये सहभाग घेतला होता.

No comments:

Post a Comment