सुरक्षित अंतर ठेवून चंदगड येथील सरकारमान्य रास्त धान्य दुकानात धान्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2020

सुरक्षित अंतर ठेवून चंदगड येथील सरकारमान्य रास्त धान्य दुकानात धान्याचे वाटप

चंदगड येथे सरकारमान्य रास्त धान्य धान्य दुकानात रेशनसाठी आलेले लोक.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील शासकीय धान्य दुकानात शिधापत्रिकावरील धान्य "कोरोना" साथीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांत सुरक्षित अंतर ठेवून वितरण करण्यात आले.
चंदगड येथील गुरुवार पेठेत असलेल्या शासनमान्य अन्नधान्य पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्य दुकानात आज धान्य वितरण करण्यात आले. शिधापत्रिका धारकांना धान्य खरेदी करताना ठराविक अंतरावर उभा राहण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे शिधापत्रिकेच्या ग्राहकांनी ठराविक अंतरावर उभा राहून धान्य वितरण करताना सहकार्य केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य क्रुष्णा उर्फ अशोक निळकंठ दाणी यांनी शिधापत्रिकाचे ग्राहकांना कोरोना बाबतीत समुपदेशन केले. धान्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र प्रत्येक ग्राहकांनी नियमाचे काटेकोर पालन केल्याने खुपच दुरवर रांग दिसत होती.

No comments:

Post a Comment