कालकुंद्री येथे जंतुनाशक फवारणी करताना ग्रामपंचायत कर्मचारी, सोबत सरपंच, उपसरपंच सदस्य आदी. |
२७ तारीख नंतर पुणे, मुंबई, गोवा, कर्नाटक, गुजरात आदी भागातून आलेल्या ३६ जणांना प्राथमिक व माध्यमिक शाळेत अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर त्यापूर्वी आलेल्या अनेकांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे. ग्रामपं. मार्फत गावात मास्क वाटप करण्यात आले आहे. विविध व्यक्ती व संघटनांनी साबण, हॅन्ड ग्लोज, हँडवॉश भाजीपालाचे वाटप केले आहे. सरपंच विनायक कांबळे, उपसरपंच सुरेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक भोगण ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गायकवाड, ईश्वर वर्पे आदींसह सर्व महिला सदस्य अहोरात्र झटत आहेत.
गेल्या दोन दिवसात ट्रॅक्टर व मोटर पंप च्या साह्याने झालेली औषध फवारणी यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह ट्रॅक्टर मालक जे. एस. पाटील, पोलीस पाटील उत्तम कोळी, कोतवाल शशिकांत सुतार, सामाजिक कार्यकर्ते एस. के. मुर्डेकर, के. आर. पाटील, निवृत्ती लोहार, पुंडलिक नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी सागर पाटील, फकिरा लोहार, नरसु कांबळे, संजय कांबळे, आशा व अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले. सर्वांनी संचारबंदी चे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. तथापि गेल्या पंधरा दिवसात शासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी इकडे फिरकले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment