चंदगड / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील बेळगुंदी येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने चंदगड तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. कर्नाटक सीमेवरील शिनोळी खुर्द, शिनोळी बुद्रुक, कोलीक, खालसा म्हाळुंगे, मळवीवाडी, तुडिये, हजगोळी, सरोळी, ढेकोळी, ढेकोळीवाडी, सुरुते हि अकरा गावे तातडीने यापूर्वीच
सील करण्यात आली आहेत. या गावाशी संपर्कात आलेल्या चंदगड तालुक्यातील हजगोळी व सुरुते या गावातील काही लोकांना तलाठी, ग्रामसेवक, व दक्षता कमिटीच्या नियंत्रणाखाली होम कॉरटाईन करण्यात आल्याची माहीती तहसलिदार विनोद रणवरे यांनी दिली.
बेळगुंदी येथे करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने चंदगड तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने जवळपासची अकरा गावे सील केली आहेत. या एकरा गावातील कोणीही व्यक्ती दुसऱ्या गावात जाऊ शकत नाही. किंवा बाहेरील अन्य कोणी व्यक्ती या अकरा गावामध्ये येवू नये. यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या अकरा गावातील सर्वेही पुर्ण झाला असून संशयितांना त्यांच्या घरीच दक्षता कमिटीच्या नियंत्रणाखाली होम कॉरटाईन करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यात अद्याप एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नसला तरी प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
No comments:
Post a Comment