कोरोना व्हायरस चा वाढत चाललेला प्रसार राखण्याकरिता देशभरातून सर्व स्तरावर प्रयत्न चालू असून या संदर्भात स्वत:चा जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन लोकांचा सर्वे करण्याचे अनमोल काम आपल्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा सेविका करत आहेत. परंतु, शासनाकडून मिळणारे अपुरे मास्क व सॅनिटाइजर मुळे सदर सेविकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन संघर्ष कृती समिती मार्फत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा सेविका यांना मोफत मास्क पुरवण्यात आले. सदरचे मास्क चंदगड पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. बी. गजलवाड यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गणेश फाटक, कायदा सल्लागार अॅड. रवि रेडेकर, कार्याध्यक्ष दौलत दळवी व पर्यवेक्षिका एस एन गोंडके उपस्थित होते. यासाठी डी. वाय. एस. पी. अंगद जाधवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
05 April 2020
Home
chandgad
कोरोनामुळे चंदगड संघर्ष कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांना मोफत मास्कचे वाटप
No comments:
Post a Comment