आणखी पंधरा दिवस सतर्क राहिल्यास कोरोनाविरोधात विजय निश्चित – जिल्हाधिकारी दौलत देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2020

आणखी पंधरा दिवस सतर्क राहिल्यास कोरोनाविरोधात विजय निश्चित – जिल्हाधिकारी दौलत देसाई


चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून आपण सर्व करीत असलेल्या आवश्यक परीश्रमाबद्दल जिल्हा प्रशासन आपले आभारी आहे. पुढील पंधरा दिवस आपण आणखी सतर्क राहिल्यास या युद्धात आपला विजय निश्चित असून यासाठी अजून काही दिवस सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नागरीकांना केले आहे. 
ते म्हणाले, ``वीस मार्च नंतर गावात व प्रभागात बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तींना त्यांचे राहण्याचे ठिकाणी अलगीकरणात ठेवावे. यात कोणतीही सूट देण्यात येऊ नये. दिल्ली किंवा इतर ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी व अलगीकरण करण्यात यावे. कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित पुढील तपासण्या कराव्यात. दिल्ली किंवा इतर ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय व संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे अलगीकरण करावे. कोरोना सदृश आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित तपासण्या कराव्यात. गावात प्रभागातील उपलब्ध सर्व सार्वजनिक उद्घोषणा ठिकाणे उदा. ग्रामपंचायत कार्यालये, मंदिरे, चर्च, मस्जिद, मदरसा, मठ इत्यादी येथून दररोज तीन वेळा संचार बंदी व बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या अलगीकरणाचे तंतोतंत पालन करण्याबाबत मोठ्या आवाजात उद्घोषणा कराव्यात. संचारबंदी व अलगीकरणाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी व बाहेरून आलेल्या व्यक्तींना त्वरित संस्थात्मक अलगीकरणमध्ये सक्तीने भरती करावे. दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर ठेवून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवावा. कोणत्याही परिस्थितीत संचारबंदी आदेशाचा भंग होणार नाही याची खात्री समितीने करावी. गावात किंवा प्रभागात कोरान पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्यास त्वरित गाव / प्रभागाच्या सीमा बंद कराव्यात. अशा व्यक्तींचे कुटुंबीय व संपर्कातील सर्व व्यक्तींची यादी करावी. त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे अशा व्यक्ती अलगीकरण किंवा विलगीकरणात असतील याबाबत समितीने दक्षता घ्यावी.`` अशा सुचना कऱण्यात आल्या आहेत. 

No comments:

Post a Comment