![]() |
गडहिंग्लज येथे कोरोना आढावा बैठकीस उपस्थित ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील. |
तेऊरवाडी (प्रतिनिधी)
गडहिंग्लज उपविभागात वैदयकिय सोयी अपुऱ्या असल्या तरीही येथील प्रशासनाने कोरोनाशी लढण्याची जय्यत तयारी केली आहे. चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालूक्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोना बाधित किंवा संशयित रुग्ण नसल्याची माहिती आमदार राजेश पाटील यानी दिली. आज गडहिंग्लज येथे ग्रामविकास मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली गडहिंग्लज येथे कोरोना व्हायरसच्या संदर्भात सर्व शासकीय अधिकाऱ्यांची प्रत्येक विभागात चालू असणाऱ्या उपाययोजना व शासनाकडून लागणाऱ्या पुढील मदतीसाठी बैठक घेतली. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
यावेळी चंदगड, गडहिंग्लज व आजरा विभागात 20000 हजार लोकांना होम कोरोंटाईन करण्यात आले असून त्यामध्ये जवळपास 7000 लोकांची मुदत संपली आहे . बाकीच्यांची येत्या 14 तारखे पर्यंत मुदत संपणार आहे. शिरगाव येथील सर्व लोकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत .तसेच या विभागात जवळपास 3000 आयसोलेशन बेड तयार करण्यात आले आहेत . हा काळ कसोटीचा असून लोकांनी आजून पर्यंन्त संयम ठेवला आहे, असाच पुढे ही ठेवावा. तसेच प्रत्येक गावात निर्माण केलेल्या दक्षता कमिटी व यातील सरपंच सर्व सदस्य ,ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी , आशा वर्कर, अंगणवाडी सेविका , तलाठी, पोलिस पाटील ,तंटामुक्त कमिटी , ANM वर्कर व गावातील प्रतिष्ठित नागरिक , सर्व सहकारी व खासगी बँकेचे कर्मचारी ,अति आवश्यक सेवा म्हणून गोकुळ दुधाचे संकलन व वितरक , एल पी जि गॅस सेवा पुरवणारे डीलर , पेट्रोल व डिझेल पुरवणारे पंपधारक तसेच शासनाची विनंती मान्य करून आपले दवाखाने या कठीण प्रसंगी चालू करणारे खासगी डॉक्टर , सर्व प्रा पत्रकार तसेच जनतेचे आज पर्यन्त सहकार्य लाभले असून पुढेही सहकार्य प्रशासनाला लाभावे असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले. यावेळी पोलीस पाटील , कोतवाल आणि ग्रामपंचायत कर्मचारी व राहिलेल्या कर्मचाऱ्यांना विमा कवचाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे नामदार हसन मुश्रीफ स यांनी सांगीतले. तसेच चंदगड ,गडहिंग्लज व आजरा या तिन्ही तालुक्यासाठी प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ तसेच येथील जनता खूप संयमी असून त्यांनी असाच संयम ठेवावा असे आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी केले,यानंतर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लजचे प्रांतधिकारी श्रीमती विजया पांगारकर , भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ संपत खिलारी , गडहिंग्लज पोलीस उपअधीक्षक अंगद जाधवर , तिन्ही तालुक्यातील तहसीलदार , बीडीओ ,पोलिस निरीक्षक ,आरोग्य विभागाचे अधिकारी व प्रशाशकीय अधिकारी तसेच गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. आंबोळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment