कोरज येथील एकजण बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2020

कोरज येथील एकजण बेपत्ता

गंगाराम नागवेकर
चंदगड (प्रतिनिधी) 
कोरज (ता. चंदगड) येथील गंगाराम मारुती नावगेकर (वय- 30) हा आपल्या राहत्या घरातून 10 मे 2017 पासून बेपत्ता झाला आहे. घटनेची वर्दी वन विभागाच्या सुळे कार्यालयात नोकरी करणारे त्याचे वडील मारुती गुंडू नावगेकर यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
गंगाराम हा बेपत्ता होऊन सुमारे अडीच वर्षे झाली आहेत. पुणे येथे ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला जातो असे सांगून निघून गेला होता. मधल्या काळात कुटुंबीयांनी पनवेल, पुणे येथील ट्रान्सपोर्ट कंपन्यांत चौकशी केली. तथापि त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.  सरतेशेवटी त्याच्या वडिलांनी पोलिसात गंगाराम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तो विवाहित असून बेपत्ता झाल्यापासून सहा-सात महिन्यांनंतर त्याची पत्नी बोंजुर्डी या आपल्या माहेरी गेली त्याला मुले नाहीत दरम्यानच्या काळात पत्नीशी संपर्क झाला नसल्याचे कळते. रंगाने सावळा, मध्यम बांधा,  उंची ५ फूट ९ इंच,  मराठी हिंदी भाषा अवगत अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास चंदगड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. विश्वजीत गाडवे करत आहेत.


No comments:

Post a Comment