कुदनुर ग्रामपंचयतीच्या वतीने नाक्यानाक्यावर कडक पहारा, गावात कडकडीत लाॅकडाऊन - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2020

कुदनुर ग्रामपंचयतीच्या वतीने नाक्यानाक्यावर कडक पहारा, गावात कडकडीत लाॅकडाऊन

कुदनूर येथे दक्षता समितीचे सदस्य गावातील नाक्यावर कडक पहारा देताना.
कोवाड / प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुदनुर (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी कडकडीत लॉकडाउन ठेवला आहे. गावच्या वेशीवर पहारा ठेवून गावातून बाहेर ये -जा करणाऱ्याना अडविले  जात आहे .  गावातून बाहेर जाणारे सर्व मार्ग सील केले असून दक्षता समितीच्या सदस्याने नाक्यानाक्यावर कडक पहारा ठेवल्याने ग्रामस्थांचे विनाकारण घराबाहेर पडणे बंद झाले आहे.
‌ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व दक्षता समितीच्या वतीने लॉकडाउनचे नेटके नियोजन केले आहे. चंदगड तालुक्यात कुदनुर गावची लोकसंख्या जास्त असल्याने ग्रामपंचायतीने लॉकडाउन कडकडीत करण्यावर भर दिला आहे. सरपंच शालन कांबळे ,उपसरपंच नामदेव कोकितकर व दक्षता समितीचे सर्व सदस्य तसेच गावातील तरुण विशेष परिश्रम घेत आहेत. पोलिस यंत्रणेकडून लॉकडाउनच्या परिस्थितीवर  नियंत्रण ठेवले आहे . चार दिवसापूर्वी  बेळगांव व बेळगुंदी परिसरात  कोरोनाचे रुग्ण सापडल्याने कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील सर्वच गावानी  विशेष खबरदारी घेतली आहे. कुदनुर गावापासून कर्नाटकची हद्द केवळ सहा किलोमीटर अंतरावर असल्याने ग्रामपंचायतीने कर्नाटकला जोडणारा हंदिगनूर हा मुख्य मार्ग तात्काळ बंद केला आहे. तसेच  गावचे इतर मार्गही सील केले आहेत. दक्षता समितीच्या सदस्यांकडून प्रत्येक मार्गावरील नाक्यावरून जागता पहारा ठेवला आहे त्यामुळे गावातून बाहेर जाणाऱ्यांना किंवा बाहेरून गावात येणाऱ्यांना दक्षता समितीच्या सदस्यांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. मात्र गावात प्रवेश देताना प्रत्येकाला हँडवॉश करुन गावात घेतले जात आहे. विनाकारण  गावातून बाहेर जाणाऱ्याना  मात्र मज्जाव केला जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर अन्य सेवा गावातून बंद केले बंद केले गावातून बंद केले बंद केले आहेत. सोशल डिस्टन्सिंगवर अधिक भर दिला आहे.शेतीकामासाठी ग्रामस्थांची चौकशी करून त्यांना बाहेर सोडले जात असले तरी पुन्हा त्याना गावात प्रवेश देताना हँडवॉश करुन घेतले जात आहे.गावातील  होम क्वारंटाईन लोकांची आरोग्य विभागाकडून दररोज  चौकशी केली जात आहे. ग्रामपंचायतीकडून  दररोज ग्रामस्थांना घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे  आव्हानही केले जात आहे.

No comments:

Post a Comment