स्वामीकार रणजीत देसाई यांचे स्मारक होण्याचे चंदगड वासियांचे स्वप्न अधुरेच - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2020

स्वामीकार रणजीत देसाई यांचे स्मारक होण्याचे चंदगड वासियांचे स्वप्न अधुरेच

लेखक रणजित देसाई
कोवाड / प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री रणजित देसाई यांची आज 92 जयंती अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्यानी  साहित्यक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला अशा स्वामीकार रणजित देसाई यांचे स्मारक व्हावे ही चंदगड वासियांची स्वप्न आज अखेर अधुरेच राहिले असून शासनाने याची दखल घेऊन हे स्मारक पूर्ण होण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी तालुक्यातील साहित्यिक मंडळीतून होत आहे.
स्वामीकर रणजित देसाई यांची आज 92 वी जयंती अनेक साहित्य पुरस्काराने सन्मानित झालेले दादा जाऊन 28 वर्षे पूर्ण झाली. तरीही त्यांच्या स्मृतीला वंदन करताना अनेक राजकीय नेत्यांनी दादांचे स्मारक होण्याचे आशा दाखवली होती. पण अद्याप साहित्यिक रणजित देसाई यांचे स्मारक होण्याकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. श्रीमान योगी ,अभोगी, राधेय, पावनखिंड ,माझा गाव ,बारी, राजा रविवर्मा ,शेकरा या सारख्या कादंबऱ्या रुपमहाल ,मधुमती, कमोदिनी ,गंधाली असे कथासंग्रह  तर स्वामी, वारसा, हे बंध रेशमाचे ,रामशास्त्री ,श्रीमान योगी असे एकापेक्षा एक असे नाटक  त्यांनी लिहिली आणि साहित्य क्षेत्रात एक वेगळं वलय निर्माण केलं. कथा कादंबऱ्या ,नाटके,एकाकिका,ललित लेखन ,प्रवास वर्णन आणि चित्रपट लेखनातून दादांनी आपली वेगळी ओळख साहित्यक्षेत्रात निर्माण केली होती.  अनेक साहित्य रत्न पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने त्यांना सन्मानित केले .त्यांच्या अनेक पुस्तकांच्या वेग वेगळ्या भाषेत अनेक आवृत्त्या निघाल्या पण दादांचे स्मारक होण्याचे स्वप्न चंदगड वासियाचे अपूर्णच राहिले असून हे स्मारक पूर्ण व्हावे असे चंदगड तालुक्यातील साहित्य मंडळींची इच्छा असून शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment