इतिहासात प्रथमच झाला श्री वैजनाथाचा साधेपणाने विवाह - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2020

इतिहासात प्रथमच झाला श्री वैजनाथाचा साधेपणाने विवाह

देवरवाडी येथील श्री वैजनाथ देवाचा विविह प्रसंग.
शिनोळी / प्रतिनिधी
       ज्ञात इतिहासात प्रथमच देवरवाडी (ता. चंदगड) येथिल वैजनाथ /आरोग्य भवानीचा विवाह सोहळा कोरोना साथीच्या खबरदारी मुळे साधेपणाने पार पडला.
        दरवर्षी चैत्र पोर्णिमेला हस्त नक्षत्राच्या मुहूर्तावर मध्यरात्री पारंपरिक कडोली ता.बेळगाव येथिल वऱ्हाडी
मंडळीच्या उपस्थितीत हा विवाह वैदिक पद्धतीने पार पडतो. त्यानंतर दवणा यात्रा उत्सवाला प्रारंभ होतो. तिसऱ्या दिवशी महाप्रसादाने सांगता होते. विवाह, यात्रा आणि महाप्रसादासाठी पंचक्रोशीतील तसेच बेळगाव परीसरातून शेकडो भाविक उपस्थित असतात. तथापि यंदा 2020 सालचा  उत्सव कोरोना प्रतिबंधासाठी जमाव तथा संचार बंदी असलेने प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार व्यक्ती अंतर पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केवळ विवाहविधी पार पाडण्यात आला. दरवर्षी सासनकाठी नाचवत ,गुलालखोबऱ्याचीच्या उधळणीत होणाऱ्या पण यंदा विरजण पडलेल्या या उत्सवाची खंत सर्वांनाच लागून राहीली.

No comments:

Post a Comment