तेऊरवाडी ( प्रतिनिधी )
चिंचणे ( कमलवाडी ) ता . चंदगड कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते . शाळेमध्ये कोरंटाइन केलेल्या या रुग्णांच्या संपर्कात एक कुटुंबिय आले होते . पण त्या कुटुंबियाचे स्वॅब निगेटिव्ह आल्याने सर्वानी आनंद व्यक्त केला.
आज या सर्वांना फुले देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. कमलवाडीची ग्रामपंचायत चिंचणे असली तरी कमलवाडी आणि तेऊरवाडी गावामध्ये केवळ आठ फुटांचा रस्ता आहे. या अगोदरच चिंचणे व तेऊरवाडी मध्ये कोरोणा रुग्ण सापडले असल्याने तीन्ही गावे भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. प्रशासनाने दोन्ही गावातील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिना चंदगडला स्वॅब साठी नेले होते. पैकी चिंचणे येथील व्यक्तिचे अहवाल निगेटिव्ह आल्याने एस. टी. बसने आज मंगळवारी या सर्वाना चिंचणेला सोडण्यात आले. यावेळी चिंचणे ग्रामस्थांनी या सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
No comments:
Post a Comment