तेऊरवाडी येथील दयानंद पाटील यांच्याकडून १ हजार मास्क वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2020

तेऊरवाडी येथील दयानंद पाटील यांच्याकडून १ हजार मास्क वाटप

तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे कोरोना रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर दयानंद पाटील यांनी मोफत एक हजार मास्कचे वाटप केले. 
तेऊरवाडी (प्रतिनिधी)
          समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विमा सल्लागार दयानंद पाटील यांनी मोफत एक हजार मास्कचे वाटप केले.
          तेऊरवाडी येथे कोरोना रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दयानंद पाटील यांनी चांगल्या दर्जाचे मास्क वाटप केले. मराठी विद्यामंदिर तेऊरवाडी, माध्यमिक विद्यालय, आश्रमशाळा आदि ठिकाणी कॉरंटाईन केलेल्या सर्वांना मोफत मास्क वाटप केले. यावेळी नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. 


No comments:

Post a Comment