चंदगड शहरातील दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरु करण्यास मुभा – मुख्याधिकारी अभिजित जगताप - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2020

चंदगड शहरातील दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरु करण्यास मुभा – मुख्याधिकारी अभिजित जगताप

चंदगड / प्रतिनिधी
         चंदगड शहरामध्ये पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनंतर गुरुवारी (ता. 28) शहरातील सर्व व्यवहार सुरु होणार आहेत. लॉकडाऊन काहीसे शिथील झाल्यानंतर चंदगड शहरातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु राहतील. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरीक व दुकानदारांनी नियमांचे पालन करुन दुकाने सुरु करावी. नियमांचा भंग करणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा चंदगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित जगताप यांनी दिला आहे.

यासंदर्भात नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या सुचना खालीलप्रमाणे आहेत -
1. किराणा दुकाने: गुरुवार पासून किराणा दुकाने सुरू होतील. गुरुवारी बाजाराचा दिवस असल्याने खूप गर्दी होणार आहे. त्याचीच वाट कोरोना विषाणू पाहत आहे. त्यामुळे अत्यंत आवश्यक असेल तरच खरेदीसाठी ग्राहकांनी बाहेर पडावे. तसेच मास्क आणि सोशल अंतर पाळावे. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.  दुकानदार बंधू यांनीही खबरदारी घेवून सोशल अंतर राखण्यासाठी माणूस नियुक्त करावा. अन्यथा दंडात्मक आणि फौजदारी अशा दोन्ही कारवाई ला सामोरे जावे लागेल. कोणीही रस्त्यावर अतिक्रमण करू नये. दुकानदार बंधू यांनी घरपोच किंवा गावपोच सेवा द्यावी. जेणेकरून ग्राहक कोरोना घेवून दुकानापर्यंत येणार नाहीत.

2. इतर दुकाने: बंधूंनी लक्षात घ्यावे की हा काळ जीव वाचवण्याचा आहे. नफा कमावणे या हेतूने दुकाने सुरू करू नयेत. हॉटेल चालकांनी फक्त पार्सल द्यावे. केशकर्तनालयानी सर्वतोपरी काळजी घ्यावी.

3. रास्त भाव: ग्राहकांना योग्य भावात वस्तू द्याव्या. मा. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी घोषित केलेल्या भावा पेक्षा जास्त भावाने विक्री करणे हा गुन्हा आहे. ग्राहकांनी बिल घेवून वस्तू खरेदी कराव्यात. बिलाचा आग्रह धरावा. जेणेकरून तक्रार दाखल करताना सोयीचे जाईल.

4. भाजी विक्री: साठी कन्या प्रशालेची जागा तात्पुरत्या स्वरूपात घेतली आहे. त्याच्या बाहेर कोणीही भाजी विक्री करू नये. खासकरून आंबे व इतर फळ विक्रेते मुख्य रस्त्यावर विक्री करताना दिसतात. त्यांना सूचना देण्यात येते की अशा प्रकारे कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

5. शहरातील ग्राहक: संयम पाळावा. अनावश्यक कामाकरीता गाड्या वापरू नयेत. गर्दी असेपर्यंत ३ दिवस बाजारात येणे टाळावे. राज्यात व्यापारी व भाजी विक्रेते ग्राहकांच्या अत्यंत जवळून संपर्कात येत असल्यामुळे त्यांना जास्त धोका आहे. राज्यभरात अनेकजण कोरोना बाधित झालेले आहेत.

6. तालुक्यातील ग्राहक: शहरात सद्ध्या 17 पाझिटीव्ह कोरोना पेशन्ट उपचार घेत आहेत. ४५  संशयित सुद्धा शहरात क्वारंटाईन आहेत. शहरातील डॉक्टर, शासकीय यंत्रणा संरक्षण घेऊन त्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे शक्यतो चंदगड शहरात अनावश्यक कामा करता येणे टाळावे. बाजार सुरू होण्याची वाट आपणच नाही तर कोरोना सुद्धा पाहत आहे.

7. शहर सीमा: शहराच्या ४ सीमेवर चेक पॉइंट्स आहेत. तेथे बाहेरील व्यक्तींना गाडी लावून चालत आत जावे लागेल. तेथील स्वयंसेवक किंवा शिक्षक, पोलिस यांच्याशी वाद घालू नये. येथे सीमेवर ताप आहे किंवा नाही हे तपासले जाईल. जर ताप असेल तर दवाखान्यात पाठवले जाईल. त्यांचा स्वाव घ्यावा किंवा कसे हे डॉक्टर साहेब ठरवतील.

8. मला कोरोना होणार नाही, झाला तरी काही फरक पडणार नाही या मानसिकतेतून बाहेर पडावे. अन्यथा शाळेत १५ दिवस राहण्याची मानसिकता बनवावी.


No comments:

Post a Comment