![]() |
कोवाड : कोरंटाइनसाठी खुले केलेले रणजीत देसाई यांचे वारीतील लेखनगृह. |
कोवाड (ता. चंदगड) येथील ख्यातनाम साहित्यिक पद्मश्री रणजीतदादा देसाई यांचे गावाजवळील वारी या ठिकाणचे लेखनगृह क्वारंटाईन लोकांच्यासाठी खुले केले आहे. रणजीत देसाई यांचे नातू गौरव नाईक यांनी हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे गावकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या ठिकाणी देसाई यांनी अनेक गाजलेल्या पुस्तकांचे लेखन केले आहे. महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक व राजकारणी मंडळी व काही मंत्र्यानी भेटी दिल्या आहेत. चंदगड तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून कोवाडची ओळख आहे. या ठिकाणी मराठी शाळा, कला महाविद्यालय तसेच अन्य ठिकाणी कोरंटाइनची क्षमता संपली आहे. मात्र बाहेरून येणार्या नागरिकांची संख्या वाढत आहे. याची दखल घेत गौरव नाईक यांनी गावाला लागूनच असणारे वारी या ठिकाणचे रणजीत देसाई यांचे लेखनगृहच नागरिकांना खुले केले आहे. या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा आहेत. त्यांच्या या निर्णया बद्दल परिसरात कौतुक होत आहे.
........
No comments:
Post a Comment