तेऊरवाडी येथे बैलांच्या सहाय्याने शेताची पूरणीपूर्व मशागत (कुळवण) करताना शेतकरी.
|
येत्या काही दिवसात मोसमी पावसाला सुरवात होत असल्याने चंदगड तालूक्याच्या पूर्व भागात धूळवाफ पेरणीपूर्व कामाला वेग आला आहे. त्याबरोबरच खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
चंदगडच्या पूर्वं भागात रोपेऐवजी धूळवाफ पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. या अगोदर परिसरात वळीव पाऊस पडल्याने शेतीमशागत काम करणे सोपे झाले आहे. त्यामूळे कोवाड, तेऊरवाडी, कुदनूर, दुंडगे , किणी , निट्टूर, मलतवाडी, म्हाळेवाडी आदि परिसरात धूळवाफ पेरणी केली जाते. शेतकरी वर्ग सकाळीच शेतामध्ये दाखल होत आहेत. कोरोणामुळे गावापेक्षा शेतच बरे असे म्हणून शेतीकामातच ते व्यस्त आहेत. नांगरणे, कुळवणे, फळे लावून शेत सपाटीकरण करणे, शेतातील काश्या, दगड व कचरा वेचणे. बांद बंदिस्ती करणे आदि कामे वेगात चालू आहेत. बैलजोडया कमी झाल्याने बरेच शेतकरी ट्रॅक्टर, पावर ट्रेलर यांचा उपयोग करत आहेत. तर शेतामध्ये गतवर्षाच्या पुराने प्रचंड नुकसान झालेले शेतकरी जेसीबी मशिनचा आधार घेत आहेत. बैलांचे दिवस भाडे १२०० रुपये झाले आहे तर ट्रॅक्टर भाडे ताशी ६०० रुपये इतके आहे. कोरोनामुळे मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची खूप अडचण झाली आहे.
याबरोबरच पारंपारिक बियाणापेक्षा आधुनिक बियाणांचा वापर करण्यावर शेतकरऱ्यांनी भर दिला आहे. भात बियाणांचा सरासरी दर ८० ते १०० रुपये प्रति किलो असा ठेवण्यात आला आहे. तर ५० किलो खताचा दर १ हजार ते १र०० रुपयापर्यंत आहे. चंदगड तालुक्यात चंदगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांसाठी खत उपलब्ध करून दिले आहे. येत्या दोन - तीन दिवसात या परिसरात धूळवाफ पेरणी करण्याची लगीनघाई चालू होणार हे मात्र निश्चित.
No comments:
Post a Comment