तुडये (ता. चंदगड) येथ चंदगड आगाराच्या वतीने विद्यार्थ्यींना थेट शाळेत पास वितरण केले. यावेळी चंदगड आगार प्रमुख सतीश पाटील, नियंत्रक चौकुळकर व इतर.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध शाळा महाविद्यालयात गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनी एसटी बसने प्रवास करत असतात. त्यांना बसचे पास काढण्यासाठी चंदगड आगारात यावे लागत होते. तथापि नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदगड आगारात येण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण चंदगड आगाराचे कर्तव्यदक्ष व्यवस्थापक सतीश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी २३ जून पासून तालुक्यातील शाळा महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन पास देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
राज्याचे परिवहन मंत्री व परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार ही अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून सवलतीच्या दरात केवळ ३३% रक्कम भरून घेऊन विद्यार्थ्यांना मासिक पास दिले जात आहेत. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून बारावी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पास चेही वितरण केले जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याचा त्रास चुकला आहे. चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी या कामी नुकतीच श्री रामलिंग हायस्कूल व जुनिअर कॉलेज तुडये येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना पास चे वाटप केले. यावेळेस स्थानक प्रमुख विशाल शेवाळे व महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment