चंदगड मधील प्रशासकीय कार्यालयांकडे जाणारा मुख्य मार्ग खड्डेमय, ग्रामस्थांचे खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2025

चंदगड मधील प्रशासकीय कार्यालयांकडे जाणारा मुख्य मार्ग खड्डेमय, ग्रामस्थांचे खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन

 

चंदगड येथे तहसील कार्यालयकडे जाणाऱ्या रस्त्यात पडलेल्या तलाव सदृश्य खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करताना चंदगडचे नागरिक

चंदगड : सी एल वृत्तसेवा
     चंदगड हे महाराष्ट्राचे दक्षिण टोक व तालुक्याचे ठिकाण आहे. चंदगड या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, न्यायालय, एसटी डेपो, पंचायत समिती, तलाठी ऑफिस, सर्कल ऑफिस, प्राथमिक शाळा अशा शासकीय व प्रशासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.  या मार्गावरून दुचाकी चार चाकी वाहने तर सोडा चालणेही मुश्किल झाले आहे. अनेक वर्षी हा रस्ता खड्डेमय असूनही संबंधित  विभाग  डोळे बंद करून खुर्चीवर गप्प बसलेला आहे. मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तातडीने भरून घ्यावे. जर दोन दिवसात खड्डे भरले नाही तर संबंधित विभागाला जागे करण्यासाठी छत्रपती संभाजी चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा नागरिकांनी दिला आहे. 
 या पडलेल्या खड्ड्यांमध्ये आज ग्रामस्थांमार्फत वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंद उर्फ बाळासाहेब हळदणकर, नविद अत्तार, अल्ताफ सय्यद, नागेश प्रधान, जुबेर आगा, सलीम सय्यद, समीर मदार, तजमुद्दीन फनीबंद,  किरण येरूळकर, समीउल्ला मुल्ला आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment