चंदगड / प्रतिनिधी
पूणे- मुंबई येथून चंदगड तालुक्यात आलेल्या ६१ नागरिकाचे व आजरा येथील मयताच्या संपर्कातील ३ स्वॅब कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी साठी कोल्हापुरला पाठविल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डाॅ. आर के खोत यानी दिली.
शासनाने पूणे, मुंबई येथील चाकरमान्यांना काही अटीवर गावी येण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त पूणे, मुंबई ,कोल्हापूर व ईतर शहरात वास्तव्यास असणार्या चाकरमान्यांची सध्या गावा गावात गर्दी होत आहे. आरोग्य विभाग,आशा व शिक्षक यांच्या करवी गावचा सर्व्हे सूरू आहे, त्यानूसार बाहेरून येणाऱ्यांची चंदगड तहसिल कार्यालयात नोंद झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्यांची तपासणी केली जात आहे. पहिल्या दोन दिवसात 62 चाकरमान्यांचे स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आल्याची माहिती डाॅ. खोत यानी दिली.
No comments:
Post a Comment