गडहिंग्लज येथील रुग्णांलयातील डाॅक्टरांना पी .पी. ई किटचे वितरण करताना मान्यवर. |
चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या माजीआमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचेकडुन गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील कोविड 19( COVID 19) च्या संक्रमनास प्रतिबंध करण्याकरिता जे वैद्यकिय अधिकारी काम करित आहेत. त्यांना योग्य सुरक्षा मिळावी व पुर्ण कार्यक्षमतेने काम करता यावे. याकरिता पी. पी. ई. किटस् व फेस शिल्डस् (PPE KIT & FACE SHIELDS) चे वाटप गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय व चंदगड ग्रामीण रूग्णांलयात करण्यात आले. यावेळी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. आंबोळे व चंदगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास साने यांचेकडे एकुण असे 40 पी. पी. ई. किटस् (PPE KIT) व 50 फेस शिल्डस् (FACE SHIELDS) सुपूर्द करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती उपसभापती सौ. श्रिया कोणकेरी, माजी उपसभापती सौ. बनश्री चौगुले, कोल्हापूर जिल्हा मजुर संघाचे संचालक उदयराव जोशी, राजेश पाटील-औरनाळकर, युवक अध्यक्ष राकेश पाटील-मुत्नाळकर, दशरथ कुपेकर, भीमराव राजाराम, विकी कोणकेरी, दयानंद देवाण, राहुल देसाई, प्रवीण सातवेकर आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment