चंदगड तालुक्यात कोरोनाच्या प्रवेशामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत कोवाड बाजारपेठ बंदचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2020

चंदगड तालुक्यात कोरोनाच्या प्रवेशामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत कोवाड बाजारपेठ बंदचा निर्णय

चंदगड तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुगणांच्या पार्श्वभुमीवर बंद असलेली कोवाड बाजारपेठ.
कोवाड / प्रतिनिधी
       एकीकडे सीमाभागामध्ये कोरोनाची दहशत आहे तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा कोरोणामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच पुन्हा नव्याने एकाच दिवशी तीन कोरोनाबाधीत नवीन रुग्ण मिळाल्यामुळे संपूर्ण जिल्हातील प्रशासन यंत्रणा हादरून गेली आहे. कोरोना ग्रामिण भागात येनार नाही अशा खोट्या अविर्भावात असणाऱ्या चंदगड ग्रामवासीयांची आता खरा धसका घेतला आहे तो, रेड झोनमधून येणाऱ्या लोकांचा. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत कोवाड बाजारपेठ बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. 
         ज्या-ज्या गावांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. त्या बाजूचा दोन तीन किलोमीटरचा परिसर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे. लोकांची वर्दळ थांबावी, होणारी गर्दी थांबावी यासाठी तालुका प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कर्यात भागातील पंचक्रोशीचे लोक कोवाड बाजारपेठेवर अवलंबून आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून कोवाड बाजारपेठ पूर्ववत ठराविक वेळेत चालू होती. पण शनिवारच्या घटनेचा धसका घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता कोवाड बाजारपेठ पुन्हा बंद करण्यात आली आहे.
           चंदगड तालुक्यातील अलबादेवी मध्ये एक तर आजरा तालुक्यातील हारूर येथे दोन कोरोणा बाधित रुग्ण सापडल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे कर्यात भागातील लोकांची या ठिकाणाची वर्दळ थांबावी,होणारी गर्दी टाळता यावी  यासाठी कोवाड बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ग्रामस्तरीय कमिटी व व्यापारी संघटनेने घेतला आहे.यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतर्गत मेडिकल सेवा सुरू राहणार आहेत. मेडिकल सेवा सोडून अत्यावश्यक सेवेत येणारी बाकीची दुकाने सुद्धा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद असणार आहेत. यातच पुणे ,मुंबई बरोबरच इतर रेड झोन असलेल्या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांची तपासणी आवश्यक केली आहे. कारण जिल्ह्यात एकाच दिवशी जे तीन कोरोणा बाधित रुग्ण सापडले आहेत त्या तिघांचीही ट्रॅव्हल हिस्टरी ही मुंबई रिटर्न आहे.त्यामुळे रेड झोन मधून आलेल्या लोकांना थेट गावामध्ये प्रवेश  दिला जाणार नाही.


No comments:

Post a Comment