चंदगड / प्रतिनिधी
देशासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथे मुंबईहून आलेला व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडला आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यासह शहरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे चंदगड शहरात धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १०) ते बुधवारी (ता. १३) या कालावधीत चंदगड बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व व्यापारी संघटना यांनी उत्स्फूर्तपणे घेतला आहे.
या बंद काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. या कालावधीत केवळ मेडिकल व दुध सेवा सुरु असतील. शहरातील नागरीक व बाहेरगावाहून येणाऱ्या नागरीकांनी सरकारी नियमांचे पालन करुन स्वत: सोबत शहरही सुरक्षित ठेवावे अशी सुचना केली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात थोडीशी शिथिलता मिळाल्याने शहरासह बाहेगावातून कामानिमित्त शहरामध्ये आलेल्या नागरीकांनी एकच गर्दी केली होती. शहरातील दुकाने दुपारी दोपर्यंत खुली ठेवण्यास मुभा होती. मात्र या नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. चंदगड तालुक्यात करोना रुग्ण सापडल्याने हा निर्णय सर्वांच्या हिताचा आहे.
No comments:
Post a Comment