![]() |
लाॅकडाऊनमुळे तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील जंगलात गेल्या दिड महिन्यापासून लहान मुलांच्यासह अडकून पडलेले मध्य प्रदेशातील आदिवाशी लोक. |
ओ साहेब आम्हाला आमच्या गावला पाठवून देवा की , या जंगलात खायला काय भेटत नाही.जंगलातील नुसती करवंद, चारं खाऊन जीव मरणाला आलाय. ओ भाऊ काय तरी खायला द्या की, अशी आर्त हाक तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील जंगलात गेल्या दिड महिन्यापासून अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील आदिवाशी नी चंदगड लाईव्हच्या प्रतिनिधीसमोर व्यथा मांडली.
देशात कोरोणामुळे लॉक डाऊन झाले आणी जिकडे- तिकडे लोक, पर्यटक, मजूर, विद्यार्थी अडकून पडले. असेच तेऊरवाडीच्या जंगलात कर्नाटक - महाराष्ट्र सिमेनजीक मध्य प्रदेशातील आदिवासी जमात गेल्या दिड महिण्यापासून अडकून पडली आहे. या जमातीमधे १० कुटुंबातील ४८ सदस्य आहेत. जडी -बुट्टी, वन औषधे, मध विकणे हा त्यांचा व्यवसाय. पण सध्या सर्वत्र लॉक डाऊन असल्याने या लोकांना कोणात्याच गावात घेतले जात नाही. या सर्वाना कोरोणा म्हणजे काय? सोशल डिस्टन्सींग, मास्क, सॅनिटायझर यांची काहीच माहिती नाही.
![]() |
मदतीच्या प्रतिक्षेत असलेले लोक. |
जंगलातून प्रवास करत हे आदिवासी तेऊरवाडी येथे आले आहेत. डोकीवर छप्पर तर नाहीच पण जेवण आणी पिण्याचा पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहेत. पण या सर्वाना आधार दिला आहे तो तेऊरवाडी ग्रामस्थ, एकता फौंडेशन, श्री राम विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायत व चंदगड लाईव्ह न्यूज चॅनलने. शासनाकडून तलाठी तलाठी दयानंद कांबळे व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भिंगुडे, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी धान्य उपलब्ध करून दिले. पण रोज ५० जणांच्या जेवणासाठी ते अपूरे पडत आहे. गर्द जंगलात, काळ्याकुट्ट अंधारात जंगली श्वापदांच्या सानिध्यात असणारे हे सर्व आदिवाशी आम्हाला गावी जाऊ द्या नाहितर खायला काय तरी द्या, अशी डोळ्यात आसवे आणून विनवनी करताना पाहून आपले डोळेही पाणावल्याशिवाय राहत नाहीत. यामध्ये १५ पेक्षा अधिक लहान लहान मूले मली आहेत. अनेक लहान मूलांच्या अंगावर कपडे नाहीत तर सर्वांच्याच पायात चपलेचा पत्ताच नाही. गेल्या दिड महिण्यात भाजी, कांदा, तेलाची फोडणी, मुलांच्या डोकीला तेल व आंघोळीचा पत्ताच नाही .
![]() |
चंदगड लाईव्ह न्यूज कडून प्रतिनिधी संजय पाटील आर्थिक मदत देताना. |
1 comment:
जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत त्यांना मदत करत रहा.
Post a Comment