पुणे-मुंबईसह शहरातून चंदगड तालुक्यात अनेकजन दाखल, प्रशासनाची तारांबळ, यंत्रणेवर ताण - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2020

पुणे-मुंबईसह शहरातून चंदगड तालुक्यात अनेकजन दाखल, प्रशासनाची तारांबळ, यंत्रणेवर ताण

चंदगड / प्रतिनिधी
         करोनाच्या फैलाव झपाट्याने वाढत असून याचा सर्वाधिक फटका शहरातील लोकांना बसत आहे. खाण्या-पिण्यासह अन्य अनेक गोष्टीची गैरसोय होत असणे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुणे-मुंबईसह अन्य शहरातून कामानिमित्त गेलेले चाकरमानी, व्यावसायिक व विद्यार्थी गावाकडे येत आहेत. काही अटींच्यावर सरकारने त्यांना गावी येण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र याचा चंदगड तालुक्यातील आरोग्य यंणत्रेवर मोठा ताण पडत आहे. 
        चंदगड तालुक्यात चंदगड या तालुक्याच्या ठिकाण ग्रामीण रुग्णांलय, हेरे, माणगाव, कोवाड, तुडये, कानुर व अडकूर या सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. नागरीक करोनाच्या भितीने मोठ्या प्रमाणात गावाकडे परतु लागल्यामुळे या सर्वांच्यावर नियंत्रण ठेवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. शहरातून येणाऱ्यांसाठी त्या-त्या गावातील शाळा व अन्य ठिकाणी क्वारंटाईन करण्याची सोय केली आहे. मात्र काही शाळांच्यामध्ये प्राथमिक सुविधा नसल्यामुळे अनेकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरातून येणाऱ्या नागरीकांची संख्या जात असल्याने शाळामध्ये क्वारंटाईन करताना मर्यादा येत आहेत. उर्वरित लोकांना कोठे ठेवायचे असा प्रश्न गावा-गावातील दक्षता कमिट्यांना पडला आहे. क्वारंटाईन केलेल्या काही नागरीकांच्याकडून नियम पाळले जात नसल्याने धोका अधिक वाढला आहे. क्वारंटाईन केलेल्यांना जेवण देतानाही नियम पाळले जात नसल्याने काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. शहरातून आलेल्यांनी सरकारी नियमांचे पालन न केल्यास त्याचा फटका गावातील ग्रामस्थांना बसणार आहे. त्यामुळे सर्वांनी सरकारी नियमांचे पालन करण्याच्या सुचना वारंवार दक्षता कमिटीकडून दिल्या जात आहेत. चंदगड येथील फादर ॲग्नेल स्कुलमध्ये शहरातून येणाऱ्यांची स्वॅब घेण्याची सोय केली आहे. मात्र रोज अनेक लोक येत असल्याने स्वॅब देण्यासाठी रांग दिसत आहेत. 
शहरातून गावी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. रोज दिडशे ते दोनशे जणांचे स्वॅब घेतले जात आहेत. आज दिवसभरात १४० नागरीकांचे व आतापर्यंत ६५५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले  आहेत. बाहेरुन येणाऱ्यांची संख्या वाढल्याने स्बॅव तपासणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वॅबचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितली.


No comments:

Post a Comment