जीवनावश्यक वस्तुची मदत स्विकारताना मुंबईस्थित कोवाडचे नागरीक. |
कोवाड / प्रतिनिधी
मुंबई मध्ये वाढणाऱ्या कोरोनाबधितांच्या संख्येमुळे मुंबईकर आपल्या मूळ गावी येऊन संस्थात्मक कॉरं टाईन होत आहेत.या सर्व परिस्थितीत या लोकांना आपुलकीच्या भावणेतून आज कोवाड मधील युवकवर्ग आणि ग्रामस्थ यांनी जीवणापयोगी वस्तूंच्या एकूण 35 किट्सचे वाटप करून मुंबईकरानो....घाबरू नका,आम्ही आहोत तुमच्या सोबत, अशाच प्रकारचा एक संदेश दिला आहे.
काही दिवसांपासून मुंबईकरांच्या गावी येण्यावरून मुंबईकर व ग्रामस्थ मधील वाद याबाबतच्या अनेक पोस्ट ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत होत्या.यातच काही मुंबईकर शासनाच्या परवानगीने काही अटीवर आपापली वैद्यकीय तपासणी करून घेऊन गावात दाखल होऊन कॉरंटाईन झाले आहेत.
अशा लोकांची त्या त्या गावातील शाळामध्ये व्यवस्था केली असून त्यांना खाण्यापिण्याच्या बाबतीतील सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न चालू आहे.आपल्या जिवाभावाच्या लोकांची गैरसोय होऊ नये ,त्यांच्या मनामध्ये गावाविषयी असलेली ओढ कायम रहावी या भावनेतून कोवाडवासियाकडून मास्क,सॅनिटायझर, तांदूळ,डाळ,चटणी,मीठ,तेल,साखर,चहा,साबण इ. वस्तूंच्या 35 किट्स आज देण्यात आल्या. कोरोणा मुळे दुरावलेली मने जोडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला असून कायम गाव हे मुंबईकरांच्या अडीअडचणी व पाठीशी असणार असल्याची भावना या युवक वर्गाने यावेळी बोलून दाखविली आहे.
यासाठी रणजित भातकांडे,अध्यक्ष शंकर पाटील, तंटामुक्त कमिटी पुंडलिक चोपडे,रामा वांद्रे,शिवानंद अंगडी,बाळू भोगण अमित भोगण, जोतिबा व्हन्याळ कर, आदम मुल्ला,दीपक कोरी,विशाल पाटील,मयूर हजारे,अशोक मनवाडकर,सुशांत सुतार,विजय जाधव,विष्णू बुरुड,राजू वांद्रे,संजय पाटील,विक्रम पेडणेकर व ग्रामस्थ यांचे सहकार्य मोलाचे ठरले. आजची परिस्थिती पाहता कोवडकरानी समाजासमोर एक प्रकारे आदर्श ठेवला असून प्रत्येक गावाने मुंबईकरांच्या पाठीशी उभे राहण्याची खरी गरज आहे.
गेल्या वर्षीच्या ऑगस्ट मध्ये अनेक गावात आलेल्या महापुरामध्ये याच मुंबईकरासहित वेगवेगळ्या ठिकाणाहून वेळेत मदत आली होती,पण आजच्या परिस्थितीत संकट हे मुंबईकरासहित बाहेरून येणाऱ्या लोकांवर ओढवले असताना सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची खरी गरज आहे.
1 comment:
Good job
Post a Comment