सलून दुकाने चालू करण्यास शासनाने परवानगी द्यावी - नाभिक समाजाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2020

सलून दुकाने चालू करण्यास शासनाने परवानगी द्यावी - नाभिक समाजाची मागणी

तेऊरवाडी ( प्रतिनिधी ) 
कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर गेल्या दोन महिण्यापासून  शासनाच्या आदेशानुसार चंदगड तालुक्यातील नाभिकांची सलून  दुकाने बंद ठेवली आहेत. या काळात व्यवसाय बंद असल्यामुळे नाभिक समाजावर ऊपासमारीची वेळ आली आहे. त्यामूळे शासनाने सलून दुकाने चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी चंदगड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष हणमंत जाधव यानी केली आहे.
या समाजाचं उदरनिर्वाह हा याच व्यवसायावर होतो. या समाजाकडे जमिनीपण नाहीत आणि असल्यातरी तुटपुंज्या आहेत. त्या जमिनीवर त्यांचा चरितार्थ चालत नाही. दुसरं असं की 99% लोकांची दुकानं ही  भाडेतत्वावर असल्यामुळे दुकानाचं भाडं देणही मुश्कील होऊन बसलेलं आहे. त्यामुळे नाभिक बांधवाना आपली कुटुंब चालविणे जिकिरीचं होत चाललेलं आहे. दुसरं असं की शासनानं या समाजाचा विचारच केला नसल्याने नकळत भूकबळी होण्याचा धोका संभवू शकतो. कर्नाटक सरकारनं प्रत्येक व्यावसायिकाला ५००० रुपये दिलेत त्यापध्दतीनं महाराष्ट्र सरकारनही अशा पध्दतीने या व्यावसाईकांचा विचार करावा. हा सारा विचार करुन शासनानं नाभिक कांना सलून दुकानं चालू करण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी नाभिक संघटनेच्यावतीने  तालुका अध्यक्ष  हणमंत जाधव,जिल्हा उपाध्यक्ष  कृष्णा बामणे,जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद वाडकर,माजी अध्यक्ष  गुंडू शिवणगेकर, शंकर कोरी,  सुनिल सपताळे व श्री वैजनाथ शिवणगेकर यांच्यावतीने करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment