जांबरे येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांच्या कडून मदत - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2020

जांबरे येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांच्या कडून मदत

चंदगड / प्रतिनिधी
          कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर गोवास्थित चंदगड तालुक्यातील जांभरे येथील हॉटेल व्यावसायिक व 
सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांच्याकडुन तुडये, हजगोळी व मळवी परिसरातील काही गरजूंना मदत करण्यात आली. 
          चंदगड तालुक्यातील जांबरे येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे हे गेली कित्येक वर्षे गोवा येथे हॉटेल व्यवसाय करतात. कोरोना साथीमुळे गेली दिड-दोन महीने हाताच्या कामावर पोट भरणाऱ्या अनेक कुटूंबाचे हाल होत आहेत. रोजगार नसल्याने तसेच शेतात राबणेही अवघड झाले आहे. शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. ग्रामीण भागातील सर्वांना लॉकडाउन मुळे कठीण झाले आहे. आर्थिक घडी विस्कटल्यामुळे लोक आर्थिक विवंचनेत आहेत. अशा वेळी काही लोक सामाजिक भावनेने अडचणीत असलेल्या लोकांना मदतीचा हात पुढे करत आहेत. अशीच मदत  जांबरे येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी चंदगड तालुक्यातील तुडये, हाजगोळी व मळवी या गावातील गरजु लोकांना जीवनावश्यक साहित्य देवून सहकार्य केले.No comments:

Post a Comment