बेळगावच्या माजी नौसैनिक संघटनेतर्फे कोरोनासाठी एक लाखाची मदत, अशोक पाटील यांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2020

बेळगावच्या माजी नौसैनिक संघटनेतर्फे कोरोनासाठी एक लाखाची मदत, अशोक पाटील यांचा पुढाकार

बेळगाव : धनादेश सुपुर्द प्रसंगी मंत्री अंगडी, आमदार बेनके, अशोक पाटील आदी.
कागणी : प्रतिनिधी 
येथील माजी नौसैनिक संघटनेकडून कोरोना विरुद्ध लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० हजार तर पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५० हजार असे एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. सदर धनादेश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी व बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील (मुळ गाव-कालकुंद्री, चंदगड),  सेक्रेटरी राजीव साळुंखे, जगदीश पाटील, खजिनदार महावीर मजगावकर, डी. जाधव, नागेश चौगुले, पिरोजी भोसले, सुभाष पाटील, निवृत्त कमांडर चिकोडी व मल्लापूरे उपस्थित होते. या मदतीबद्दल मंत्री अंगडी व आ. बेनके यांनी व्यक्त केली. आमदार श्री. बेनके म्हणाले, संघटना नेहमी सामाजिक उपक्रम राबवत आहे. या संघटनेचा इतरांनी आदर्श घेण्याचे आवाहन केले.


No comments:

Post a Comment