तेऊरवाडीतील ५० भटक्या आदिवासीना मध्य प्रदेश सिमा भागात सोडण्यात आल्याचा क्षण. |
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे गेल्या दिड महिन्यापासून अडकून पडलेल्या ४८ मध्य प्रदेशातील भटक्या जमातीतील आदिवासी ना घेऊन जाणाऱ्या चंदगड एस. टी. डेपोच्या दोन लालपरी सतत ४० तास धावत मध्यरात्री अडीज वाजता मध्य प्रदेशच्या रझेगाव चेक पोष्ट वर पोहचल्या. चंदगड एस .टी. च्या चार चालकांनी या सर्व प्रवाशांना मध्य प्रदेश सरकारकडे सुखरूप हस्तांतरण केले.
चंदगड लाईव्ह न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने तेऊरवाडी येथील ४८ व मांडेदुर्ग येथील २ अशा ५० परप्रांतियाना एकत्र करून बसच्या माध्यमातून थेट मध्य प्रवेश बॉर्डरवर सोडून सरकारच्या ताब्यात दिले. या बसेस चंदगड, तेऊरवाडी, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा मार्गे मध्य प्रदेश रझेगाव चेक पोष्ट, पोलिस ठाणे किरणापूर, जि. बालेघाट येथे १२५० कि. मी. प्रवास करुन मध्यरात्री अडीज वाजता पोहचल्या. या ठिकाणी आरोग्य तपासणी करून पुढे मध्य प्रदेश सरकारकडून या सर्वाना ४०० कि मी अंतरावर असणाऱ्या बेहलापूर कठणी येथे सोडण्यात येणार आहे. या सर्व प्रवासामध्ये चंदगड एस. टी. डेपोचे चालक प्रविण चन्नपठन (नेसरी), नामदेव देसाई (तळेवाडी), रहीम पठाण (नेसरी) व नझीर जमादार (चंदगड) यांनी कोरोना योध्यांची भूमिका बजावत सर्व प्रवाशांना सुखरूप पोहचवून चंदगड परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. या सर्व प्रवाशांनी आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, चंदगड लाईव्ह लाईव्ह न्यूजचे पत्रकार एस. के. पाटील, पत्रकार व कॅमेरामन संजय पाटील यांच्यासह चंदगड लाईव्हची टीम व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment