ऑनलाईन संगीत.गायन स्पर्धेत संस्कृती राजाराम कांबळेचे सुयश - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2020

ऑनलाईन संगीत.गायन स्पर्धेत संस्कृती राजाराम कांबळेचे सुयश

संस्कृती कांबळे
तेऊरवाडी - सीएल वृत्तसेवा
         सर्वेशानंद संगीत विद्यालय बेळगाव यांच्या संस्थापक सौ. चंद्रज्योती देसाई यांच्या कल्पकतेतून बेळगाव येथे ऑनलाईन गायन स्पर्धा आयोजित केली होती. त्यामधे संस्कृती राजाराम कांबळे मु.नेसरी (ता. गडहिंग्लज) हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
        सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली संस्कृती ही मोठ्या गटातूत सहभाग घेतला होता त्या गटात इ. ५ ते १o वीच्या वर्गातील मुलांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीचे स्पर्धा परिक्षण अतुल अरूण दाते यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. परीक्षण समारंभात संस्कृतीच्या निवडलेल्या 'भोर भयै पनघट पे मोरे शाम सताये' या गीता बदल खास कौतुक केले. प्रथम फेरीचे  परीक्षक म्हणून किशोर काकडे व शंकर पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धात कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव आणि गडहिंग्लजच्या बालकलाकारांनी भाग घेतला होता. संस्कृती गेली ५ वर्ष मच्छिद्र बुवा यांचे स्वरसाधना गडहिंग्लज येथे गुरुकुलपद्धती ने संगीत शिक्षणाचे धडे घेत आहेत. ती आता इ ५ वीच्या वर्गात श्री. व्ही. के, चव्हाण पाटील विद्यालय, नेसरीत शिकत आहे. या यशाबद्दल तीचे कौतुक होत आहे. संस्कृती न यापूर्वी अनेक ठिकाणी बेळगाव, पुणे, कोल्हापूरच्या स्पर्धातून विशेष पारितोषिके प्राप्त केली आहे. मागील वर्षा. ती कलर्स चॅनेल्स 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात सेकंड राऊड पर्यत मजल मारली होती. त्यावेळी महेश काळे आणि अवदूत गुप्ते यांनी तीचे खूप कौतुक केले होते.

No comments:

Post a Comment