कोरोना युद्धाच्या काळात अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या आशा वर्कर यांना सी एल न्युजकडून प्रशस्तीपत्रकाने सन्मानीत - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2020

कोरोना युद्धाच्या काळात अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या आशा वर्कर यांना सी एल न्युजकडून प्रशस्तीपत्रकाने सन्मानीत

कोवाड येथे आशा स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्या सुनीता पाटील,नंदिनी पाटील व शीतल जाधव यांचा सत्कार करताना मान्यवर.
चंदगड / सी एल वृत्तसेवा
      कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात गावपातळीवर सर्व्हे करण्यापासून ते कॉरंटाईन केलेल्याच्या नोंदी ठेवण्यापर्यंत त्यात्या गाव पातळीवरील वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वर्ग यांच्या बरोबरच तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका ह्या राष्ट्रीय कर्त्यव्याच्या भावनेतून आपले काम प्रामाणिक पणे पार पाडत आहेत. ह्या कोरोना युद्धातील रणरागिनीं आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना चंदगड तालुका पत्रकार संघ संलग्न सी. एल. न्युजच्या वतीने कोवाड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी विजया पांगारकर, गटविकास अधिकारी बी. डी. जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
सत्कार करताना गटविकास अधिकारी आर. बी. जोशी.
        यावेळी त्यांनी केलेल्या कामाबद्दल बोलताना गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी भावुक होऊन आपल्या मनोगतातून त्यांच्या कामाची स्तुती केली, यावेळी त्या म्हणाल्या कि, जर एखादा युद्ध लढायचं असेल तर सैन्य हे महत्वाचं ठरत असतं त्या सैन्याच्या निष्ठेवर,कर्तबगारीवर विजय निश्चित होत असतो. आजच्या कोरोनाच्या काळात गावपातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याबरोबरच आशा स्वयंसेविका,गतप्रवर्तक,सफाई कामगार,अंगणवाडी सेविका,मदतनीस हे आमचं सैन्य होत आणि आहे .पोलीस प्रशासना बरोबरच या सर्वांवर आमची संपूर्ण भिस्त आहे.सुरुवातीच्या कालावधीत पुरेश्या सुरक्षेच्या साधनांच्या अभावी या सर्वांनी या युध्यामध्ये आपापली सेवा बजावली आहे.त्यांच्या मुळेच प्राप्त झालेल्या इतयंभूत माहितीच्या आधारे प्रशासन कोरोना च्या महामारीला समर्थपणे तोंड देत आहे आणि त्यावर मात करत आहे.
सत्कार करताना कोवाडच्या सरपंच सौ. अनिता भोगण, शेजारी प्रांताधिकारी श्री. पांगारकर.
       अशा या योध्यामधील आशा स्वयंसेविकांचा पत्रकार संघाचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले असून त्यांना त्यांच्या कामाची पोच पावती देण्याचा प्रयत्न केला आहे.त्याबद्दल चंदगड तालुका पत्रकार संघ देखील कौतुकास पात्र आहे. यावेळी गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, कोवाडच्या सरपंच अनिता भोगण, उपसरपंच विष्णू आडाव, कोवाड बीटचे मंडल अधिकारी आपासो जिनराळे, तलाठी दीपक कांबळे, ग्रामसेवक जी. एल. पाटील, कागणीच्या सरपंच सुप्रिया कांबळे, उपसरपंच कांबळे जनार्दन देसाई, भाजपा शहर प्रमुख सुरेश वांद्रे, दुडगे सरपंच राजेंद्र पाटील,निट्टूर चे सरपंच अमोल सुतार ,तेऊरवाडी ग्रामपंचायत चे सदस्य राजेंद्र भिंगुडे, चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक, अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे, संपादक संपत पाटील, अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सदस्य संतोष सुतार, तातोबा पाटील, प्रकाश ऐनापुरे, निवृत्ती हरकारे, चेतन शेरेगार, महेश बसापुरे, राजेंद्र शिवणगेकर, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment