उद्योजक मारुती लांडे यांच्याकडून तहसिलदार यांच्याकडे ईसीजी मशीन देताना |
चंदगड तालुक्यातील मलतवाडी येथील मारुती रामू लांडे या मुंबईस्थित उद्योजकाने चंदगड तालुका आरोग्य विभागाला ईसीजी तपासणी मशीन भेटीदाखल आज चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे नायब तहसीलदार डी एम्ं नांगरे यांच्या उपस्थितीत भेटीदाखल की मशीन देण्यात आली. चंदगड तालुक्यातील अनेक चाकरमानी पुण्या-मुंबई येथे आपला रोजंदारी चा प्रश्न मिटवण्यासाठी कार्यरत आहेत. सध्या कोरोणा रोगाच्या प्रादुर्भावामुळे ही सर्व मंडळी चंदगड तालुक्यात दाखल झाली असून चंदगड आरोग्य विभागाला ECG तपासणी मशीन देऊन आरोग्य यंत्रनेला सहकार्य करण्याच्या उद्देशाने ही भेट उद्योजक मारुती लांडे यांनी दिली. यावेळी धनंजय महाडिक युवाशक्ती आघाडी चंदगड तालुका अध्यक्ष मायाप्पा पाटील ,सर्कल संजय राजगोळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment