डॉ. मुरकुटे, डॉ. कदम यांच्याकडून प्रिन्स पाईप कंपनीमध्ये अर्सेनिक अलबम गोळ्यांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2020

डॉ. मुरकुटे, डॉ. कदम यांच्याकडून प्रिन्स पाईप कंपनीमध्ये अर्सेनिक अलबम गोळ्यांचे वाटप

शिनोळी : एचआर कल्लापा कोकितकर, प्लांट हेड प्रदीप माने यांच्याकडे गोळ्या वाटप करताना डॉ. एन. टी. मुरकूटे व  डॉ. प्रशांत कदम व अन्य मान्यवर.
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
       शिनोळी (ता. चंदगड) येथील प्रिन्स पाईप अँड फिटिंग्स कंपनी मध्ये डॉ. एन. टी. मुरकुटे (मुरकुटेवाडी) व  डॉ. प्रशांत कदम (शिनोळी) यांच्यातर्फे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त अशा आयुर्वेदिक अर्सेनिक अलबम गोळ्या मोफत वाटप करण्यात आल्या.
       शासनाने लॉकडाऊनमध्ये बदल करत विविध कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कर्मचारी कोरोनाची भीती न बाळगता कामगार कामावर येत आहेत. अशा सर्व कामगारांची आरोग्यविषयक काळजी घेऊन कंपनीचे एचआर कल्लापा कोकितकर व प्लांटचे हेड प्रदीप माने यांनी डॉ. एन. टी. मुरकुटे यांच्याकडे आयुर्वेदिक गोळ्या उपलब्ध होतील का, अशी विचारणा केली. यानंतर त्यांनी सर्व कामगारांना मोफत गोळ्या वाटप करुन मार्गदर्शनही केले. डॉ. प्रशांत कदम यांनी सुद्धा मार्गदर्शन करुन गोळ्यांचे वाटप केले. या वेळी अधिकारी, कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment