![]() |
एस. के. पाटील संजय पाटील संदिप तारीहाळकर |
कोरोनाच्या काळात चंदगड लाइव्ह न्यूजच्या पत्रकारानी उत्कृष्ठ वृत्तांकन करून व्हीडोओ न्यूज प्रसिद्ध केल्या होत्या. या कार्याची दखल घेत कोवाड परिसरातील सरपंच, सदस्य व मान्यवरानी या पत्रकार कोरोना योध्यांचा सत्कार समारंभ कोवाड येथे सोमवार ८ जून रोजी करण्यात येणार आहे .
यावेळी गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर ,चंदगडचे गटविकास अधिकारी आर .बी. जोशी, मंडल अधिकारी आप्पासो जिनराळे, कोवाडच्या सरपंचा सौ. अनिता भोगण, उपसरपंच विष्णू आढाव, ग्रामसेवक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकार एस.के. पाटील, संदिप तारिहाळकर, संजय पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे. माऊली मंदिर कोवाड येथे दुपारी 3 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन निटटूरचे सरपंच अमोल सुतार, दुंडगेचे सरपंच राजू पाटील, तेऊरवाडी ग्रा.पं. सदस्य राजेंद्र भिंगुडे यानी केले आहे.
No comments:
Post a Comment