आजरा आगाराचे सहा. वाहतूक निरीक्षक काशिनाथ कलकूटकी निवृत्त - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2020

आजरा आगाराचे सहा. वाहतूक निरीक्षक काशिनाथ कलकूटकी निवृत्त

 काशिनाथ कलकुटकी
आजरा / सीएल वृत्त सेवा
        आजरा एस टि आगाराचे  काशिनाथ कलकुटकी हे सहा वाहतूक निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांनी एकूण 33  वर्ष एस टी ची सेवा करून ते निवृत्त झाले 3 फेब्रुवारी 1987 रोजी ते चालक या पदावर भरती झाले होते तर 1995 साली ते खात्यांतर्गत सहा वाहतूक निरीक्षक हि परीक्षा उत्तीर्ण झाले यावेळी ते कोल्हापूर विभागीय कार्यालया ला चेकिंग इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले यानंतर 1998 ला ट्रेनिंग इन्स्पेक्टर झाले यानंतर सण 2018 पर्येंत गडहिंग्लज आगाराला सहा वाहतूक निरीक्षक  पदावर काम पाहिले यानंतर पुन्हा कोल्हापूर व काही दिवसांनी पुन्हा  आजरा आगाराला सहा वाहतूक निरीक्षक या पदावरून ते निवृत्त झाले एस टी मध्ये त्यांनी प्रमाणिक व उल्लेखनीय सेवा केली प्रशासन,कामगार सेना, इंटक संघटना,कामगार संघटना यांच्यावतीने त्यांचा सपत्नीक कुटुंबा चा हि सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या या जीवनप्रवासात पत्नी सौ विमल मुले जयशिवा, राजशिवा,मुलगी सौ सोनम,आई श्रीमती सुशीला यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment