गृहमंत्री अनिल देशमुख कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2020

गृहमंत्री अनिल देशमुख कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

 कोल्हापूर / प्रतिनिधी
            महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार, दिनांक 27 जून रोजी दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा, सायं. 4.30 ते 6.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक, रात्री, शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.रविवार, दिनांक 28 जून रोजी सकाळी 9.00 वाजता कोल्हापूर येथून मोटारीने साताराकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment