लॉकडाऊन कोवाडला प्रथमच आलेल्या एसटी बस चालकांचा सत्कार करताना सरपंच राजू जाधव ,कुमार वांद्रे |
गेल्या ७० हून आधिक दिवस बंद असणारी चंदगड आगाराची कोवाड ( ता. चंदगड ) मार्गावरील एसटी सेवा आज सुरू करण्यात आली . हि एस .टी.बस घेऊन येणाऱ्या चालक व वाहकांचा सत्कार दुंडगे ग्रामपंचायतीचे सरपंच राजू पाटील व कुमार वांद्रे यानी केला .
आज चंदगड आगाराच्या दोन गाडया चंदगड - कोवाड , कोवाड- चंदगड अशा धावल्या . सकाळी नऊ वाजता चालक पी .आर . हाजगोळकर व वाहक एच .एस.
कानेकर तर दुपारच्या सत्रात चालक एस .एल.पाटील , वाहक एन .आर. वाकतकर यानी आपली सेवा बजावली .कोवाड येथे बस आले नंतर सरपंच राजू पाटील,व कुमार वांद्रे यानी चालक व वाहकांचा सत्कार करून कार्याला शुभेच्छा दिल्या . तसेच या बस सेवेचा लाभ योग्य ती काळजी घेऊन प्रवाशानी घ्यावा असे आवाहनही सरपंच राजू पाटील यानी केले .
No comments:
Post a Comment