तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे मटका अड्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. यामध्ये पाच जणांकडून 11 हजार रोख व मटका साहित्य जप्त करण्यात आले. अशोक नाईक, शेखर सावलगी, उत्तम गोईलकर, संजय पाटील, धनाजी नाईक सर्वजन (रा. नेसरी) येथील असून यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. येथील अशोक नाईक यांच्या राहत्या घरी फोन वरून मटका चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती .इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने हा छापा टाकला.
No comments:
Post a Comment